14 December 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

मराठ्यांसोबत पुन्हा तेच-तेच का घडतं? 2018 मध्ये भाजपच्या फुगड्या, 2024 मध्ये शिंदेंच्या राजकीय सगेसोयऱ्यांचे अभिनंदनाचे इव्हेन्ट

Maratha Reservation

Maratha Reservation | विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

आता गोर गरीब मराठ्यांना आंदोलना शिवाय पर्याय नाही
आता आम्हाला गोर गरीब मराठ्यांना आंदोलना शिवाय पर्याय नाही. तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार हे नक्की असा इशारा सरकारला दिलाय. तसेच, सगे सोयरेबाबत समाजाची स्पष्ट भूमिका आहे. अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. लढण्यासाठी सज्ज आहोत. उद्या आमची बैठक आहे. त्याआधी कोणीही कोणतंही आंदोलन करू नका ही विनंती आहे. उद्या कायम आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत असेही ते म्हणाले.

आरक्षण आकड्याचा घसरता आकडा
मात्र, मराठा समाजाला पूर्वी दिलेलं 16 टक्के आरक्षण 10 टक्क्यांवरती कसे आले? यावर एक नजर टाकली असता तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात या आरक्षणाचा विशेष प्रवास झाला आहे. सर्वात आधी मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण सरकारने 16 टक्के आरक्षण दिलं होतं. ते न्यायालयाने नाकारलं, मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं. ते न्यायालयाने शिक्षणात 12 टक्के आणि नोकरीत 13 टक्क्यांवर आणलं. हेसुद्धा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकले नाही.

पण आता, राज्य मागास आयोगाने जे निकष दिले, त्या निकषाने पाहणी केली, त्या पाहणीतून त्यांनी ज्या प्रकारचा निकाल दिला. त्यानुसार आजचं 10 टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले. आणि हा निर्णय जाहीर केला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी.

दुसरीकडे, शिवरायांचे वंशज सुद्धा लोकसभा किंवा राज्यसभेवर घेऊन त्यांची तोंड सुद्धा भाजपने केव्हाच बंद केली आहेत. अगदी प्रतिक्रिया आलीच तर वरवरची प्रतिक्रिया असते हे अनेकदा पाहायला मिळते. विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज अभिनंदनाची जी तत्परता दाखवली, त्यातून अनेकांनी ही मनोज जरांगेंना मराठ्यांचा चेहरा न बनू देण्याची राजकीय लगबग म्हटलं आहे. त्यांनी आज केलेल्या ट्विटवर मराठा समाजाच्या प्रतिक्रिया बरंच काही सांगून जात आहेत.

तारीख 30 नोव्हेंबर 2018 – भाजपच्या कार्यालयांबाहेर फुगड्या
तारीख 30 नोव्हेंबर 2018 प्रदीर्घ संघर्षानंतर कोणत्याही विरोधाशिवाय महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले होते. २०१९ च्या निवडणुका २-३ महिन्यावर जवळ असल्याने राज्यातील मराठा शक्तीचा प्रभाव ओळखून फडणवीसांनी स्वतःचा प्रचंड जयजयकार करून घेतला होता. कारण राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना कोणत्या ना कोणत्या समाजाची राजकीय किनार होती. पण फडणवीस यांच्याकडे लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार कोणत्याही अमुक समाजचे नेते म्हणून मान्यता नव्हती. तसेच ब्राह्मण समाजाची मतांची आकडेवारी अशी नव्हती की त्यांचे कोणी नेतृत्व करावे.

म्हणून फडणवीसांनी चाणाक्षपणे भाजपातील सर्वच ओबीसी आणि मराठा नेत्यांचं महत्व कमी करून चाणाक्ष पणे स्वतःला ओबीसी आणि मराठा नेत्यांचे तारणहार असा प्रचार स्वतःच्या समर्थकांकडून घेण्यास सुरुवात केली होती. तारीख 30 नोव्हेंबर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नैत्रुत्वात अध्यादेश मंजूर होताच मुंबई भाजप कार्यालयाच्या बाहेर भाजप पदाधिकाऱ्यांनी फुगड्या घातल्या होत्या. तसेच लाडू-पेढे भरवत फडणवीसांचा सत्कार केला होता. पण नंतर त्या आरक्षणाचं काय झालं ते सर्वश्रुत आहे.

मात्र १३ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे हे भाजपला माहिती असल्याने, त्यांनी तोंडावर आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्ण फायदा घेतला होता. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी २०० जागांवर मराठा मतदार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडण्याच्या स्थितीत आजही आहेत. २०१८ वर्षाच्या शेवटी मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे श्रेय घेऊन त्याचा फायदा भाजपला नक्कीच घ्यायचा होता आणि तो त्यांनी घेतला होता. पण दुसऱ्या बाजूला तोच मराठा समाज आजही पुन्हा भाजपवर विश्वास ठेवतोय आणि इथेच त्याचं पुढेही काहीच होणार हे स्पष्ट होतंय. आजही नेमकं तेच झालंय, फरक इतकाच आहे की तेव्हा भाजपने कार्यालयाबाहेर फुगड्या घातल्या होत्या आणि आज मुख्यमंत्री शिंदेंच्या राजकीय सगेसोयऱ्यांनी गुलाल उधळत ढोलताशांवर फुगड्या घातल्या आहेत. कारण पुन्हा लोकसभा-विधानसभा निवडणुका १-२ महिन्यांवर आल्या आहेत.

आता केवळ आणि केवळ….
पण आता मराठा समाजाच्या बाबतीत सर्वकाही अवलंबून आहे ते केवळ आणि केवळ मराठा समाज किती एकीने मनोज जरांगे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो त्यावर, असंच म्हणावं लागेल.

अन्यथा राजकीय सगेसोयऱ्यांचे धिंगाणे चिरंतर पाहत राहावे एवढच हातात असेल…

Sage Soyre

Sagesoyare

News Title : Maratha Reservation by Shinde Fadnavis government check details 20 February 2024.

हॅशटॅग्स

#Maratha Reservation(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x