7 August 2020 9:37 AM
अँप डाउनलोड

राज ठाकरेंची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट

Raj Thackeray, Sharad Pawar

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश काल दिल्यानंतर आज लगेचच मनसेप्रमुखराज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. राज ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काल राज ठाकरेंनी जाहीर सभा घेत पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहांवर शरसंधान साधलं. या देशाची नवी सुरुवात होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दोन माणसं राजकीय पटलावरून बाजूला होणं आवश्यक आहे. त्यामुळे यांच्याविरोधात प्रचार करा. फायदा व्हायचा त्यांना होऊ दे, असे आदेश काल राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले. ‘यंदाची निवडणूक मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी आहे. कोण काँग्रेसचा, कोण राष्ट्रवादीचा याच्याशी कर्तव्यच नाही. मोदीमुक्त भारत झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि हे मी गुढीपाडव्याच्या सभेतच सांगितलं होतं,’ असं राज यांनी म्हटलं होतं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(632)#Sharad Pawar(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x