21 October 2019 4:12 PM
अँप डाउनलोड

तब्बल २६ वर्षानंतर अनिल गोटे-शरद पवार भेट

MLA Anil Gote, Dhule

धुळे : भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्बल २६ वर्षांनंतर भेट घेतली आहे. एकमेकांचे कायम टीकाकार राहिलेल्या गोटे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली आहे.

राजकारणामध्ये कोणी दीर्घकाळ शत्रू नसतो. मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे,’ असं म्हणत अनिल गोटे यांनी धुळ्यातील भाजप नेते सुभाष भामरे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. यावेळी त्यांनी सुभाष भामरेंवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत.

सुभाष भामरे यांनी धुळे जिल्ह्याची वाट लावली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी मी भामरेंविरोधात निवडणूक लढवत आहे,’ अशी घोषणा अनिल गोटे यांनी केली आहे.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(173)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या