13 November 2019 11:57 PM
अँप डाउनलोड

मनसे कार्यकर्त्यामुळे ७ वर्षांनी बीडचा गणेश डाके कुटुंबियांना सापडला

पालघर : पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांच्या पुढाकाराने गणेश पुष्कर डाके हा तरुण तब्बल ७ वर्षांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटला आहे. गणेश डाके मूळचा बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरीचा रहिवासी असल्याचे समजते.

गणेश डाके हा मागील सात वर्षांपासून घरातून बेपत्ता झाला होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शोधण्याचे खूप प्रयत्नं केले होते, परंतु काहीच फायदा झाला नव्हता. विशेष म्हणजे गणेश डाके अनेक वर्षांपासून केवळ सर्वत्र भटकत होता आणि मिळेल त्या व्यक्तीकडून काही तरी गयावया करत तो पोट भरायचा. दोन दिवसांपूर्वी पालघरमध्ये एक व्यक्ती मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्या किराणा मालाच्या दुकानाजवळ येऊन खाण्यासाठी वारंवार हात पसरत होता. त्यामुळे त्याला खायला देऊन सहज विचारपूस केली आणि त्याच्याकडील पिशवीत त्यांना मतदान कार्ड मिळाले. त्यानुसार तो बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरीचा रहिवासी असल्याचे समजले.

त्यामुळे तुलसी जोशी यांनी मनसे बीड जिल्हा सचिव अभिषेक गोल्हार तसेच मारुती दुनगे यांच्याशी संपर्क साधला व सदर व्यक्तीचा पत्ता शोधण्याची विनंती केली. तोपर्यंत तुलसी जोशी यांनी गणेशला सलूनमध्ये कटिंग, दाडी आणि आंघोळ घालुन पालघर पोलीस टेन्शन’मध्ये घेऊन गेले आणि पोलिसांमार्फत गणेशच्या कुटुंबियांशी बीडला संपर्क साधून त्यांना पालघरला बोलावून घेतले. ७ वर्षांपासून दुरावलेल्या गणेशला पाहून कुटूंबियांना सुद्धा खूप आनंद झाला होता. त्यामुळे इथे तुलसी जोशी यांनी एका जवाबदार नागरिकाप्रमाणे विषय हाताळल्याने गणेश ७ वर्षांनी कुटुंबियांना मिळाला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(471)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या