15 May 2021 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
x

दाक्षिणात्य नेते राहुल गांधींच्या पाठीशी, तर मोदी स्वतःला राजे समजतात अशी टीका

चेन्नई : देशात सध्या सर्वत्र अराजक माजले असून पंतप्रधान मोदींनी सत्ताकाळात देशाला १५ वर्षे मागे रेटले आहे. मोदी स्व:ताला देशाचे राजे समजत आहेत. त्यामुळे देशाला आता नव्या तरुण पंतप्रधानाची गरज आहे. दरम्यान, तामिळनाडूतर्फे आघाडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आपण मांडत असल्याचे DMKचे अध्यक्ष एम के स्टॅलिन जाहीरपणे म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण चेन्नईमधील DMKच्या मुख्यालयात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सुद्धा हजर होते. त्यावेळी सभेत उपस्थितांना संबोधित करताना स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. देशभरात सध्या मोठं अराजक माजले असून मोदी यांनी गेल्या ५ वर्षांत देशाला १५ वर्षे मागे लोटले आहे असा घणाघात स्टॅलिन यांनी केला.

जर देशाने त्यांना पुन्हा पंतप्रधानपदावर बसविल्यास देश आणखी ५० वर्षे मागे फेकला जाईल याची मला खात्री असल्याचे, स्टॅलिन यावेळी म्हणाले. कारण मोदी स्व:ताला देशाचे राजे समजत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र येवून देशाची लोकशाही आणि देशाला वाचवणार आहोत.दरम्यान, राहुल गांधी यांच्यात मोदी सरकारला हरवण्याची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#DMK(3)#Narendra Modi(1540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x