17 April 2021 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

सेना आमदार उदय सामंत म्हाडा अध्यक्ष, हा योगायोग? सेना शाखाप्रमुखाला ५ कोटींची दोन घरे!

मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसापूर्वीच मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांच्याबाबत एक ट्विट केलं होतं. दरम्यान, काल घोषित झालेल्या नशीबवान उमेदवारांमध्ये खरी लॉटरी लागली आहे ती शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाला. इथे खरी लॉटरी लागली आहे ती शिवसेना खासदार, नगरसेवक आणि शाखाप्रमुख यांची असंच म्हणावं लागेल. कारण म्हाडाच्या इतिहासातील ग्रँट रोड येथील ५ कोटी किंमत असलेल्या दोन घरांसाठी शिवसेना शाखाप्रमुख विनोद शिर्के यांना खरी लॉटरी लागली आहे. तर शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परळ येथील ९९ लाखांच्या घराची लॉटरी लागले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे १ हजार ३८४ घरांची सोडत रविवारी काढण्यात आली. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात ही सोडत काढण्यात आली. यंदाच्या सोडतीत मुख्य आकर्षण ठरले ते उच्च उत्पन्न गटातील पाच कोटींची घरे. म्हाडाच्या सोडतीच्या इतिहासात प्रथमच ५ कोटी किंमत असलेल्या घरांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही कोट्यवधींची घरे कुणाचा नशिबात आहेत याची उत्सुकता होती.

शिवसेनेच्या विनोद शिर्के यांनी ५ कोटी ८० लाख आणि ४ कोटी ९९ लाखांच्या महागड्या घरांसाठी म्हाडाकडे अर्ज केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही घरांच्या बाबतीत शिवसेनेचे शाखाप्रमुख विनोद शिर्के यांची लॉटरी लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं ट्विट केलं होतं माजी खासदार निलेश राणे यांनी?

हॅशटॅग्स

#Shivsena(1075)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x