13 May 2021 8:47 AM
अँप डाउनलोड

मुंबईतील सेव्हन-हिल्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या पैशातून मोठा आर्थिक घोटाळा?

मुंबई : मुंबईमधील अंधेरी पूर्व येथील सेव्हन-हिल्स हॉस्पिटल’मध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. सध्या व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या नावावर हा घोटाळा ढकलून स्वतःची कातडी वाचवण्याच्या हालचाली करत असल्याचे वृत्त आहे. सदर हॉस्पिटलचा विक्री व्यवहार सध्या सुरु असून, अंतर्गत व्यवस्थापन न्यायालयीन देखरेखे खाली आहे आणि तरी आर्थिक घोटाळा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रुग्णावरील शस्त्रक्रिया किंवा उपचारादरम्यान येणार एकूण खर्च रोखीने जमा करून घेत असत. त्यानंतर रुग्णांच्या एकूण बिलामध्ये सूट दिल्याच्या नावाने, रुग्णांच्या बिलांवर कोणत्याही अधिकृत स्वाक्षरी शिवाय तीच ‘सूट’ दिलेली रक्कम संबंधित कर्मचारी स्वतःच लाटत असल्याचे समजते. परंतु आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरण हे व्यवस्थापनच्या मदतीशिवाय शक्य नसल्याचे वृत्त आहे.

तसेच यापूर्वी झालेल्या राजीव गांधी योजनेअंतर्गत रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून दिलं जाणारं पॅकेज आणि त्याअंतर्गत येणार उपचार साहित्य कमी दर्जाचे असल्याचे रुग्णांच्या कुटुंबियांना सांगून, आम्ही चांगल्याप्रतीचे पण थोडे महागडे साहित्य बाहेरून मागवतो असे सांगून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम उकलण्यात येत होत्या. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान नेमकं कोणतं साहित्य वापरलं गेलं आणि त्याचा दर्जा याबद्दल रुग्णांना कोणतीही माहिती दिली जात नसे अशी तक्रार अनेक रुग्णांनी आमच्याकडे व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पोलीस कुटुंब कल्याणकारी योजनेनुसार उपचारासाठी दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन करून आधी रोख रक्कम भरा नाहीतर उपचार दिले जाणार नाहीत अशा दमदाटी हॉस्पिटल प्रशासनाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा देण्यात येत होत्या असे खात्रीलायक वृत्त आहे.

यापूर्वी सुद्धा सेव्हन हिल्स व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना दमदाटी, थकीत पगार आणि कार्यरत डॉक्टरांच्या अनेक कामबंद आंदोलनांमुळे चर्चेत आले आहेत. त्यामुळे वरील सर्व माहितीप्रमाणे हा आर्थिक घोटाळा काही कोटींच्या घरात असण्याची दाट शक्यता आहे. तसेच व्यवस्थापन संबंधित कर्मचाऱ्यांवर जवाबदारी झटकून स्वतःची कातडी वाचवण्याचे काम करत आहेत असा आरोप करण्यात येतो आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x