20 June 2021 10:37 PM
अँप डाउनलोड

CAA - मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा; बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या

Maha Adhiveshan, MNS Morcha, NRC, Raj Thackeray, Amit Thackeray

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर, राज ठाकरे यांनी झेंडा आवडला का? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. ते म्हणाले, येत्या ९ मार्चला पक्षाला २४ वर्षे होतील. आम्ही सर्व काही दिवसांपासून विचार करत होतो की पक्षाचं एक अधिवेशन घेणं गरजेचं आहे. सभा ज्यावेळी होते त्यावेळी सर्व एकत्र येतातच. मात्र, अधिवेशन होतं तेव्हा राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात वेळ घालवतात. तसंही अधिवेशनाची परंपरा कमी होत आहे असं राज ठाकरे म्हणाले.

मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. जे इथे येऊन धिंगाणा घालणार तर मी आडवाच जाणार. रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी आमच्या पोलिसांवर हात टाकला होता त्यावेळी मोर्चा काढणार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. हिंदी सिनेसृष्टीत पाकिस्तानी कलाकार धिंगाणा घालत होते. त्यावेळी त्यांना हाकलण्याचं काम मनसेनं केलं. त्यावेळी कोणी मला हिंदुत्वाच्या मार्गाने चाललोय हे विचारलं नाही असा सवाल राज यांनी केला.

दरम्यान, राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहे. याची माहिती देण्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेईन, असं मनसे प्रमुख यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात म्हटलं. पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून द्या. त्यासाठी माझा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

महाराष्ट्रातले ते भाग कुठले आहेत त्याबद्दल राज ठाकरे यांनी माहिती दिलेली नाही. याबद्दल आपण लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्याना भेटून त्याबद्दल माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरच्या देशातून आलेले मुस्लिम परत पाठवणं गरजेचं आहे. या देशात जे वातावरण मोर्चांनी उभं राहिलं. त्याला मोर्चाने उत्तर देणार, असे त्यांनी सांगितले. बांगलादेश, पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांना परत पाठवण्यासाठी नऊ फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानावर महामोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title:  MNS morcha to support NRC declared by Raj Thackeray at Maha Adhiveshan.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(27)#Raj Thackeary(665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x