14 December 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष | पण अंतर्गत वादामुळे जर्जर झाला - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Congress Party

मुंबई, ३० ऑगस्ट : काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. पक्षातल्या तरूणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. गट तट सगळ्यांकडे असतात विरोधी पक्षातही असे गट आहेत, असंही ते म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंदिर आंदोलन, सुशांत प्रकरण, काँग्रेसमधील वादाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. शरद पवारांसारखे अनेक नेते हे काँग्रेसमधून का बाहेर पडतात? असंही ते म्हणाले.

मधल्या काळात २३ नेत्यांनी जे काही सोनिया गांधींना पत्र पाठवलं, त्यावरचा वाद अजून क्षमलेला नाही. त्यातून काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होतोय की काय, अशी मला भीती वाटतेय. त्या २३ नेत्यांची मागणी योग्य आहे. काँग्रेसला योग्य नेतृत्व मिळावं, यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाला गांधी कुटुंबीयांशिवाय पर्याय नाही ही लोकभावना आहे. काँग्रेसचा अंतर्गत विषय देशाच्या राजकारणाशी संबंधित आहे.

काँग्रेस पक्षातून फुटूनच ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, शरद पवार, जगनमोहन रेड्डी यांनी स्वतःचे पक्ष तयार केले. त्यामुळे काँग्रेसचा सारखा पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात टिकला पाहिजे. समोर प्रबळ विरोधी पक्ष असल्यानंतर सत्ताधाऱ्यांना काम करण्याचा उत्साह येतो. राज्यात आमच्या समोर एक प्रबळ विरोधी पक्ष उभा आहे, ज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

 

News English Summary: The glory of the Congress is no more. In the meanwhile, the letter sent a storm, but it did not subside. Rahul Gandhi is a senior leader of the party, he should calm down this storm, said Shiv Sena MP Sanjay Raut. The blow will not fall on Maharashtra.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut comment congress internal issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x