12 December 2024 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला

Bonus Shares

Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुरूवारी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर करणार आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 7.96 टक्क्यांच्या वाढीसह 640 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 0.88 टक्के वाढीसह 605 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 462 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील 6 महिन्यांत आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 178 टक्क्यांनी वाढवले आहे. 2024 या वर्षात आयनॉक्स विंड स्टॉक फक्त 13 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 4.14 टक्के वाढीसह 592.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीला Hero Future Energies कंपनीने 210 MW विंड टर्बाइन जनरेटर पुरवण्याची ऑर्डर दिली आहे.

आयनॉक्स विंड कंपनीची मुख्य स्पर्धक कंपनी सुझलॉन एनर्जी आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह 40.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Inox Wind Share Price 24 April 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x