16 December 2024 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या

IndiGo Share Price

IndiGo Share Price | इंडिगो एअरलाईनची मालक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्याची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ( इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3958.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2,007.05 रुपये होती. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.16 टक्के वाढीसह 3,932.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, इंडिगो एअरलाइन्स कंपनीने 30 वाइड-बॉडी A350-900 विमानांची ऑर्डर दिली आहे. पुढील काळात इंडिगो कंपनी आणखी 70 विमाने खरेदी करू शकते. या प्रकारचे विमान रोल्स रॉइस ट्रेंट एक्सडब्ल्यूबी इंजिनने सुसज्ज असते. या ऑर्डरची पूर्तता 2027 पासून सुरू होईल. यापूर्वी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीने जून 2023 मध्ये एअरबसला 500 विमानांची मोठी ऑर्डर दिली होती.

इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत पाच दिवसात 7.02 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 59.15 टक्के नफा कमावून दिला आहे.

2024 वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत या कंपनीचे शेअर्स 32.04 टक्के मजबूत झाले आहेत. 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2021.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 149.28 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IndiGo Share Price NSE Live 27 April 2024.

हॅशटॅग्स

IndiGo Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x