18 January 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम

TRAI Message Traceability

TRAI Message Traceability | TRAI म्हणजेच टेलकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने फ्रॉड मेसेजेस, कॉल आणि एसएमएसला आळ घालण्यासाठी ‘मेसेज ट्रेसेबिलिटी’ हा नवा नियम लागू करण्याची ठोस माहिती दिली होती. बऱ्याच व्यक्ती खोटे कॉल, मेसेजेस आणि SMS ला बळी पडून स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. बऱ्याच व्यक्तींना तर SMS द्वारे खोट्या लिंक पाठवल्या जातात आणि त्यांची मोठी फसवणूक केली जाते.

कधी होणार नियम लागू :

TRIA ने 2024 ऑगस्टच्या 20 तारखेलाच या नव्या नियमाच्या लागू होण्याबाबत निर्णय कळवला होता. ज्यामध्ये 1 नोव्हेंबर पासूनच व्यावसायिक क्षेत्रातील सर्व मेसेजेसला मेसेज ट्रेसेबल केले जावे असं सांगण्यात आलं होतं. परंतु काही कारणांमुळे तारीख वाढवण्यात आली आणि 30 नोव्हेंबर करण्यात आली.

परंतु हा नियम आणखीन लांबणीवर गेला असून 11 डिसेंबर ही तारीख सांगण्यात आली आहे. ही माहिती टीआरएआयने आपल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे. याचाच अर्थ 11 डिसेंबर 2024 पासून टेलीमार्केटिंगचे भाग असलेले कोणत्याही प्रकारचे एसएमएस किंवा मेसेजेस स्वीकारले जाणार नाहीत.

नवा नियम कोणत्या पद्धतीने काम करेल :

नव्या नियमांनुसार टेलीमार्केटर त्याचबरोबर सर्व संस्थांना सांगण्यात आले की, टेलीमार्केट सर्व SMS करीता नंबरची यादी घोषित करतील. TRIA संपूर्ण नंबर सिरीज स्वतःच्या डेटामध्ये सेव्ह करणार आहे. यामधील केवळ डेटामध्ये समावेश असणाऱ्या नंबरच्या सिरीजला टेली मार्केटिंग मेसेजेससाठी पुढे पाठवण्यात येणार आहे. म्हणजेच सिरीज बाहेरचा कोणताही मेसेज स्वीकारला जाणार नाही. या गोष्टीमुळे कोणत्याही व्यक्तीला फ्रॉड मेसेजेसचा त्रास सहन करावा लागणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | TRAI Message Traceability 03 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#TRAI Message Traceability(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x