20 June 2021 2:49 PM
अँप डाउनलोड

PSLV ची हाफ सेंच्युरी, RISAT-2BR1 अवकाशात प्रक्षेपण

PSLV 50th Great Mission, RISAT 2BR1 SPY Satellite From Sriharikota

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी केलीय. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून आज रिसॅट-२ बीआर १ (RISAT-2BR1) या उग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C48 या प्रक्षेपक वाहनाद्वारे हे यान अवकाशात यशस्वीपणे झेपावलं. यातली खास बाब ही होती की PSLV या प्रक्षेपक वाहकाचं हे ५०वं उड्डाण होतं. PSLV हे भारताचं विश्वसनीय प्रक्षेपक वाहन आहे. याच वाहनाने याआधी अनेक उपग्रह अवकाशात झेपावले होते. अवकाशातून पृथ्विवरचे फोटो घेण्याचं अचूक तंत्रज्ञान या उपग्रहामध्ये आहे. अतिशय स्पष्ट आणि उत्तम दर्जाचे फोटो या उपग्रहामधून घेतात येतात. त्यामुळे हेरगिरीसाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रक्षेपकामधून रडारचा समावेश असणाऱ्या ‘रिसॅट २ बीआर १’ या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात आले. श्रीहरिकोटाहून प्रक्षेपित करण्यात येणारे हे ७५वे प्रक्षेपक आहे. भारतासह एकूण दहा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले. त्यात इस्त्रायल, इटली आणि जपानचा प्रत्येकी एक आणि अमेरिकेचे सहा उपग्रह आहेत.

त्यात विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगचे अपयश वगळता ही मोहीम यशस्वी ठरली. गगनयान ही इस्रोची पुढची महत्वाची मोहिम आहे. या मिशनतंर्गत तीन भारतीयांना अवकाशात पाठवण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.

Web Title: ISRO Successfully Launched RISAT 2BR1 SPY Satellite From Sriharikota ITs PSLV 50th Great Mission

हॅशटॅग्स

#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x