20 January 2020 7:22 PM
अँप डाउनलोड

पंकजा मुंडेंचा पक्ष ठरला, उद्याच जाहीर प्रवेशानंतर भाजपामध्ये भूकंप होणार? सविस्तर वृत्त

BJP Leader Pankaja Munde, Chief Minister Uddhav Thackeray, Eknath Khadse

परळी: मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊन मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यानिमित्ताने पंकजा मुंडेचा शिवसेना प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Loading...

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्या नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कोअर कमिट्यांच्या बैठकांना त्याची गैरहजेरी नाराजीच्या चर्चांना खतपाणी घालत आहेत. दरम्यान भाजपचे बहुजन चेहेरा असलेले दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ गडावर उद्या होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटूंब जाणाऱ असल्याची माहिती आहे. यामध्ये रश्मी ठाकरे, आमदार आदित्य आणि तेजस ठाकरे असणार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ४० मिनिटे विधानभवनात भेट घेतल्याने खडसे नक्की काय करणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, उद्या, १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्यासह आपणही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमाला विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता हेदेखील उपस्थित राहणार आहेत. खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असून भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ गडावर येण्याचं निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देताना फडणवीसांना लांब ठेवण्यात आलं आहे. तसेच पक्षातील तिकीट नाकारण्यात आलेले सर्व नेते उद्या गोपीनाथ गडावर हजर राहणार असल्याचं वृत्त आहे.

प्रचंड तणावात असलेल्या भारतीय जनता पक्षाने या संदर्भात तातडीने दिल्लीशी संपर्क करून काल राज्यपातळीवरील कोअर कमिटीची बैठक रात्री उशिरा आयोजित केली होती आणि त्याला देखील पंकजा मुंडे यांना बोलाविण्यात आलं, मात्र मला गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाची तयारी करायची असल्याचं कारण देत त्या बीडला रवाना झाल्या आणि राज्यातील भूकंपाची खात्री झाली. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी दिल्ली आणि राज्यपातळीवरील सर्व भेटीगाठींची जवाबदारी वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर टाकली होती आणि १२ तारखेपर्यंत कमालीची गुप्तता पाळण्याचं ठरलं होतं.

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्याच एक मोठा गट असून तो राज्यातील सर्व स्पर्धक आणि वरिष्ठ नेत्यांना राजकीय दृष्ट्या संपवत आहे असं या नेत्यांचं ठाम मत आहे. कालांतराने भाजप न्याय देईल असं सांगूनच त्यांना वर्षानुवर्षे झुलवत ठेवलं जातं आणि शिस्तबद्ध राजकारणातून संपवलं जातं आहे याची या नेत्यांना चुणूक लागली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस पडद्या आडून सर्वकाही करत असून, त्याला दिल्लीतील एकाधिकारशाहीचा आशीर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही असं अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये मोदी लाट आल्यानंतर मोदी भाजपचे सर्वेसेवा झाले आणि राज्यात निवडणुका लागताच आणि मुख्य म्हणजे गोपीनाथ मुंडे हयातीत असतानाच केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या मार्केटिंगमागे मोदी आणि फडणवीस हीच जोडी होती असं भाजपमधील नेते बोलत आहेत. कारण मोदींना देखील महाराष्ट्र मुठीत ठेवायचा होता आणि गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासारखे दिग्गज नेते कमजोर केल्याशिवाय ते शक्य नव्हतं आणि त्याला साथ मिळावी फडणवीस यांची जे आजही सुरु आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाचा संदर्भ देत, लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतं तुमची नसून ती मोदींना दिलेली मतं असल्याचं फडणवीस भाजप नेत्यांना मेळाव्यात ठासून सांगत होते आणि आम्ही करू तेच स्वीकारावं असा अप्रत्यक्ष संदेश देत होते. त्यातून अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता गुल करण्यात फडणवीसच होते असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे शांतराहून सर्वकाही घडवून आणणाऱ्या फडणवीसांविरुद्ध देखील तेच तंत्र अवलंबलं गेलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना संपविण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना पवार काय आहेत हे समजलं असून, पश्चिम महाराष्ट्रात भाजपची अवस्था बिकट झाली आहे. त्यात उद्याच्या संभाव्य भूकंपानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील भाजपाला सुरुंग लावण्याची योजना आखली गेली आहे. तसेच विदर्भात देखील भारतीय जनता पक्ष विशेष कामगिरी करू न शकल्याने फडणवीस देखील राजकीय पेचात आहेत. त्यात राज्यात भाजप १०४ जागांची बोंब करत असली तरी वास्तविक राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने जवळपास शंभरी गाठली आहे आणि भाजपचे निवडून आलेल्या १०४ आमदारांना शिवसेनेच्या मतदारांची मतं पडलीच नाहीत असा भ्रम फडणवीस पसरवत आहेत. उद्या होणारा राजकीय भूकंप खरा ठरल्यास, भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सामील झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते देखील पुन्हा स्वगृही परततील अशी शक्यता आहे.

मागील काही वर्ष राज्यात सत्तेत येऊन मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरून भाजपाला काहीच फायदा झालेला नाही असं दिसतं आणि त्यात वंचितने मोठ्या प्रमाणावर जागा लढवून देखील राष्ट्रवादी-काँग्रेसने जवळपास शंभरी गाठली आहे. त्यानंतर उद्याचा राजकीय भूकंप हा भारतीय जनता पक्षाचं ओबीसी राजकारण संपवणारा असेल असं म्हटलं जातं आहे आणि त्याचा त्यांना पुढील निवडणुकीत मोठा फटका बसेल. त्यामूळेच आगामी राजकीय भूकंपाची चुणूक लागल्याने मागील काही दिवसांपासून भाजपचे फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले खासदार आणि आमदार ओबीसींना सर्वाधिक संधी भाजपने दिल्याची बोंब करत आहेत.

मात्र, विषय केवळ पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे असा नसून त्यांच खडसे आणि मुंडे कुटुंबात प्रत्येकी १ असे दोन खासदार देखील आहेत. या सर्व प्रकारात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना मुंबईतील दिग्गज नेत्यांची देखील साथ मिळाल्याने फडणवीसांचा मार्ग अत्यंत खडतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रापासून ते शहरांपर्यंत भाजपाला फटका बसणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे उद्या गोपीनाथ गडावर नेमकं काय होणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.

 

Web Title:  BJP Leader Pankaja Munde May Confirmed Her Shivsena Joining In The Presence of Chief Minister Uddhav Thackeray

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

NOTE: mahapariksha, mahaportal, maha portal, mahapolice, govnokri, govnokri, govnokari, mpscworld, mpsc world, majhi naukri, majhinaukri, mazi nokari, majhi nukari, mahampsc, mahaonline, mahanmk, mahadbt, mahadbt login, mahadbtmahait, mahadbtmahait, mahanews, maha news, nokari sandharbha, majhanews, Current Recruitment 2020, Latest Government Jobs, Latest Government Jobs In Maharashtra 2020, Government Recruitment, Jobs in Government Sectors, Bank Jobs, Online Application Form, Defence Job, Engineering Jobs, freshersworld, freshers world, maharashtra police, Police Bharti, drdo recruitment, ibps, government jobs, lic recruitment, fresherslive, driving licence test, general knowledge, rto exam, mscit, ms cit, mscit course, ms cit course, driving licence test, learning license test, driving license test, learning licence test, parivahan, rto exam in english, learning licence test questions, NIOS Bridge Course for B.Ed Teacher, Talathi Bharti

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(418)#Pankaja Munde(32)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या