19 April 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | भेटीतील मूळ काम सोडून मीडियाला बाईट देण्यावर सोमय्यांचा अधिक भर?

Kirit Somiya

कोल्हापूर, २८ सप्टेंबर | मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने टीका आणि गैरव्यवहाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच, अनिल परब, सईद खान अटक, आनंदराव अडसूळ रुग्णालयात दाखल या मुद्द्यांवर देखील त्यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

BJP leader Kirit Somaiya Kolhapur visit after serious allegations against Maharashtra minister Hasan Mushrif :

आंबेमातेकडे मी प्रार्थना केली आहे की मातेनं त्यावेळी राक्षसाचा वध केला होता. आत्ता महाराष्ट्राला भ्रष्टाचाररुपी एक शाप मिळालाय, भ्रष्टाचाराचा राक्षस तयार झाला आहे, त्याचा वध करण्यासाठी मला शक्ती दे”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. दरम्यान, सोमैय्या मूळ कामापेक्षा माध्यमांना बाईट देण्याची संधी वारंवार शोधत असल्याने ते केवळ खळबळजनक आरोप करून माध्यमांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत असा देखील अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

किरीट सोमय्यांनी यापूर्वीही कोल्हापूर दौरा घोषित केला होता, त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. पण आता सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किरीट सोमय्या हे सकाळी 8 च्या सुमारास कराडहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. त्याआधी कराडमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचे शेतकरी, संचालकांनी सोमय्यांची भेट घेतली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kirit Somaiya Kolhapur visit to file complaint against Maharashtra minister Hasan Mushrif at Murgud police station today.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x