28 June 2022 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे?
x

Kirit Somaiya Vs Ajit Pawar | ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार - अजित पवार

Kirit Somiya

मुंबई, २० सप्टेंबर | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सकाळपासून ठाकरे सरकारच्या नेते-मंत्र्यांच्याविरोधात आरोपांचा धडाका लावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलिबागमधील 19 बंगल्याची आणि अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार अ्सल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार – Kirit Somaiya daily made new allegations then what to reply says DCM Ajit Pawar :

अजित पवारांनी दिलं थोडक्यात पण जोरदार प्रतिउत्तर:
आज दुपारी अजित पवार यांना सोमय्यांच्या या आरोपावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी एका वाक्यात सोमय्या प्रकरणाचा निकाल लावला. ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांवर निशाणा साधला. तसंच ही प्रतिक्रिया देताना त्यांनी सोमय्यांयं नाव न घेता त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला अजित पवार सोमय्या प्रकरणावर बोलण्यास तयार नव्हते. अगदी त्यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी एका वाक्यात त्यांनी सोमय्या यांच्या आरोपनाम्याचा निकाल लावला. . ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार, असं अजित पवार म्हणाले.

येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Kirit Somaiya daily made new allegations then what to reply says DCM Ajit Pawar.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(185)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x