18 September 2021 10:19 PM
अँप डाउनलोड

भाजप अध्यात्मिक आघाडीच्या नेत्याच्या इशाऱ्यासंबंधित प्रश्न | अजितदादा म्हणाले, कोण तुषार भोसले?

Deputy CM Ajit Pawar

कोल्हापूर, १४ जून | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तुषार भोसले यांनी वारीबाबत राज्य सरकारला इशारा दिल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल पवारांनी केला. त्यावर ते भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यावर, कोणत्याही राजकीय व्यक्तीने काही सांगितलं तर ते कितपत गांभीर्याने घ्यायचं ते वेगळं आहे. आम्ही सर्वांनी वारकीर संप्रदायाशी चर्चा केली आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे त्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे, असं पवार म्हणाले.

यंदा वारीत खंड पडू न देता वारीला परवानगी देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल करण्यात आला. तेव्हा कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल करून अजितदादांनी भोसले यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे तुषार भोसले हे चर्चेत आले आहेत.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Deputy CM Ajit Pawar taunt BJP leader Tushar Bhosle know about acharya news updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x