15 August 2022 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

गुजरातमध्ये मंत्रिमंडळ बदलण्याची मोदी-शहांची योजना | भाजपमध्ये मोठ्या राजकीय बंडाची शक्यता

Gujarat CM Bhupendra Patel

गांधीनगर, १५ सप्टेंबर | गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंत लवकरच मंत्रिमंडळाची स्थापना होईल अशी शक्यता होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांवरुन सरकारची गाडी अडली आहे. आणि नाराज आमदार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी जमा झाले आहेत. मुख्यमंत्र्यांआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार होता, मात्र या पेचामुळे हा शपथविधी लांबणीवर टाकण्यात आला.

गुजरातमध्ये मंत्रिमंडळ बदलण्याचा मोदी-शहांची योजना, भाजपमध्ये मोठ्या राजकीय बंडाची शक्यता – Gujarat CM Bhupendra Patel may give opportunity to new ministers in cabinet :

गुजरात मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपच्या जुन्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी नाराज नेते दाखल होण्यात सुरुवात झाली आहे. या नाराज नेत्यांमध्ये ईश्वर पटेल, ईश्वर परमार, बचु खाबड, वासण आहीर, योगेश पटेल यांचा समावेश आहे. सध्या रुपाणींच्या घरी या नेत्यांची बैठक सुरु असल्याचं कळतं आहे.

नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आपल्या मंत्रिमंडळात नवे चेहरे घेण्यास उत्सुक आहेत. तब्बल 20 ते 22 मंत्री आज शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये बहुतांश नवे चेहरे आणि महिलांना स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्यामुळे गुजरात भाजपच्या जुन्या नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा मार्ग दाखवला जाऊ शकतो. याशिवाय जातिय समीकरण बसवून स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी देण्याचा विचार भूपेंद्र पटेल यांनी मांडल्याचं बोललं जात आहे.

तसेच अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीपद नाकारलं जाऊ शकतं. यामध्ये भाजपचे दिग्गज नेते नितीन पटेल, भूपेंद्र सिंह चुडास्मा, आरसी फाल्दू आणि कौशिक पटेल यांचा समावेश असू शकतो. रुपाणी सरकारमध्ये नितीन पटेल हे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद सांभाळत होते. तर भूपेंद्रसिंह चुडास्मा हे शिक्षण मंत्री होते. आरसी फाल्दूंना कृषीमंत्री करण्यात आलं होतं, तर कौशिक पटेल यांना संसदीय कामकाज हे खातं देण्यात आलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले नितीन पटेल यांचा पत्ता साफ होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Gujarat CM Bhupendra Patel may give opportunity to new ministers in cabinet.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x