Terror Plan Politics | दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपी | शेलारांना योगी सरकारच्या ATS'चा विसर?
मुंबई, १५ सप्टेंबर | दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्याचं चुकीचं वृत्त पसरलं आणि या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली असताना दुसरीकडे आता भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका केली जाऊ लागली आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Terror Plan, दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपी, शेलारांना उत्तर प्रदेशच्या ATS’चा विसर? – BJP MLA Ashish Shelar criticized Maharashtra ATS on Jaan Mohammad Shaikh arrest in Mumbai :
विशेष म्हणजे दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपीमधील शहरं असली तरी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र उत्तर प्रदेशच्या ATS’कडे पूर्ण दुर्लक्ष करताना महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या ATS’वर टीका करण्याची राजकीय संधी सोडली नसल्याचं पाहायला मिळालं आहे.
तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, ओसामा उर्फ सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ ’साजू’ उर्फ लाला यांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली आहे. हे सर्व दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांना लक्ष्य करून मोठा स्फोट करण्याची योजना आखत होते.
पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन दहशतवादी दिल्लीत स्फोट करणार होते एकूण अटक केलेल्यांपैकी ओसामा उर्फ सामी आणि जीशान कमर यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की ते प्रथम विमानाने मस्कटला गेले आणि नंतर समुद्रमार्गे पाकिस्तानातील ग्वादर बंदरात गेले होते. त्यांना शस्त्रांचा वापर आणि स्फोटके बनवण्यासाठी पाकिस्तानमध्ये 15 दिवस प्रशिक्षण देण्यात आले, त्यानंतर तो त्याच मार्गाने भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांना IED लावण्यासाठी दिल्ली आणि यूपीमधील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: BJP MLA Ashish Shelar criticized Maharashtra ATS on Jaan Mohammad Shaikh arrest in Mumbai.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty