29 April 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

त्यांचं ते जनाब | आपलं जनाब ते कुछ भी अनाब शनाब | क्या जनाब देवेंद्र फडणवीस

BJP Dawat Roza Iftar, Janab Devendra Fadnavis, goes viral

मुंबई, २ जानेवारी: एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं नमूद करण्यात आलं आहे. यावर मराठी इंग्रजीसोबतच उर्दू भाषेचाही वापर करण्यात आला आहे. तसंच यावर एका ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे आणि जनाब आदित्य ठाकरे असा करण्यात आला होता.

दरम्यान शिवसेनेवर टीका केली असताना आता सोशल मीडियावर दावत-रोझा-इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत. त्यांच्या नावांपुढेही जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे. ट्विटर, फेसबुकवर या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला आहे.

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या दावत-रोझा-इफ्तारचं आयोजन अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये इफ्तारची तारीख (७ जून २०१८) देण्यात आली आहे. मुंबईतील सीएसटी येथील पलटन रोड परिसरातील हज हाऊसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. त्यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरवर असून त्यापुढे जनाब लिहिण्यात आलं आहे.

 

News English Summary: Shiv Sena is being criticized once again due to a calendar. This calendar is mentioned as Shivshahi Calendar 2021. Along with Marathi English, Urdu language has also been used on this. Also, at one place, Shiv Sena chief Balasaheb Thackeray has been mentioned as Mr. Balasaheb Thackeray. Also, the names of Uddhav Thackeray and Aaditya Thackeray were mentioned as Mr. Uddhav Thackeray and Mr. Aditya Thackeray.

News English Title: BJP Dawat Roza Iftar poster former CM Devendra Fadnavis name goes viral news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x