18 January 2025 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या

Personal Loan

Personal Loan | कोणत्याही व्यक्तीला अचानक जास्त पैशांची गरज भासली तर तो सर्वप्रथम बँकेतून पर्सनल लोन घेण्याचा विचार करतो. पर्सनल लोन घेणे त्याला फायद्याचे आणि सोपे वाटते. पर्सनल लोनची प्रोसेस फार काही मोठी नसते. प्रोसेस मोठी नसली तरी सुद्धा पर्सनल लोनचे व्याजदर इतर लोनपेक्षा जास्त असतात. व्याजदर जास्त असून सुद्धा व्यक्ती पर्सनल लोन घेण्यास जास्त प्राधान्य दर्शवतात. परंतु अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित होतो की, आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्सनल लोन घेणे फायद्याचे ठरते की नाही.

आज या बातमीपत्रातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्सनल लोन घेणे फायद्याचे ठरणार आहे की नुकसानदायक या गोष्टीची पूर्तता करणार आहोत. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते :

पर्सनल लोन हे एक अशा प्रकारचे लोन असते ज्यामध्ये तुम्ही लोन घेताना कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा इतर काहीही गहाण ठेवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी पर्सनल लोन घेत आहात ही गोष्ट अत्यंत मॅटर करते. तुम्ही जर व्यवसायासाठी पर्सनल लोन घेतलं आणि वेळेवर फेडण्यास जमले नाही तर, तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. कारण की पर्सनल लोनचे व्याजदर इतर व्याजदरांपेक्षा अधिक असते.

माहितीनुसार बऱ्याच बँकांमध्ये पर्सनल लोनवर 9.99% ते 44% टक्क्यांपर्यंत व्याजदर घेतले जातात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर व्याज फेडू शकाल की नाही या गोष्टीची माहिती करून घ्या आणि मगच पर्सनल लोन घेण्याचा विचार करा.

बिझनेससाठी पर्सनल लोन घेणे योग्य की अयोग्य :

समजा तुम्ही पर्सनल लोन घेऊन असा कोणता तरी व्यवसाय करणार असाल ज्यामध्ये लवकरात लवकर परतावा मिळणार आहे तर, तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार हमखास करू शकता. जर तुम्हाला परतावा मिळण्याचे चान्सेस किंवा व्यवसायातून लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त पैसे परत मिळण्याची शक्यता नसेल तर पर्सनल लोन घेणे टाळा अन्यथा कर्जबाजारी व्हाल.

महत्त्वाचं :

तुम्ही कोणत्याही प्रकारचे लोन घ्या जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर बँक तुमच्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्हाला कमी व्याजदराचे लोन ऑफर केले जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Personal Loan Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Personal Loan(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x