26 April 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

TTML Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टीटीएमएल शेअर 1 दिवसात 10 टक्के वाढला, शेअर पुन्हा तेजीत

TTML Share Price

TTML Share Price Today | टाटा समूहाच्या ‘टीटीएमएल’ म्हणजेच ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 67.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 5 मे रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरणीसह 66.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.65 टक्के मजबूत झाले आहेत.

एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक नफा कमावून देणाऱ्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 149.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 55 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती.

टीटीएमएल शेअर्सचा इतिहास :
मागील एका वर्षापासून टीटीएमएल कंपनीचे शेअर्स जबरदस्त मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 291.05 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. हा स्टॉक सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून 77 टक्के कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदरांना 9.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षी YTD आधारे टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 27.45 टक्के घसरले आहेत. टीटीएमएल ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 13,184.03 कोटी रुपये आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
टीटीएमएल ही Tata Teleservices या दिग्गज कंपनीची उपकंपनी आहे. टीटीएमएल ही कंपनी आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. टीटीएमएल कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस, डेटा सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक दिग्गज कंपन्या सामील आहेत. मार्च 2023 तिमाहीत टीटीएमएल कंपनीने एकूण 280 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

मात्र कंपनीला 277 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. एक वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ तोट्यात किंचित घट पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये टीटीएमएल कंपनीने 1,106.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि त्यात 1144 कोटी रुपये कंपनीचा निव्वळ तोटा होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price today on 05 May 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x