18 May 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

Veerkrupa Jewellers Share Price Today | 83 रुपयांचा शेअरने पैशाचा पाऊस, 238% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स कमाई

Veerkrupa Jewellers Share Price

Veerkrupa Jewellers Share Price Today | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जून 2022 मध्ये शेअर बाजारात दाखल झाले होते. शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे.

कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करेल. तसेच, ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी 1:10 या प्रमाणात आपले शेअर्स विभाजित करणार आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 83.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख :
‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 4 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत गुंतवणुकदारांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचा प्रस्ताव देखील मान्य केला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस आणि स्टॉक स्प्लिटसाठी 16 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 146 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 24.40 रुपये होती.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात वीरकृपा ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 238 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 25.65 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीचे शेअर्स 4 मे 2023 रोजी 86.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. IPO मध्ये या कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीत इश्यू करण्यात आले होते. आणि स्टॉक 18 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात लिस्ट करण्यात आला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Veerkrupa Jewellers Share Price today on 05 May 2023.

हॅशटॅग्स

Veerkrupa Jewellers Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x