15 December 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर तेजीत, 120 टक्के डिव्हीडंड जाहीर, कंपनीच्या भरगच्च कमाईचे तपशील पाहा

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस’ या अदानी ग्रुपच्या प्रमुख कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या अखेरच्या तिमाहीत 137 टक्के वाढीसह 722.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीने वार्षिक आधारावर 26 टक्के वाढीसह 31,346.05 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

उत्कृष्ट तिमाही निकालांसह ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर आज शुक्रवार दिनांक 5 मे रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 1,931.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. आणि त्यामुळे अदानी समूहाला ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचा एफपीओ रद्द करावा लागला होता.

कंपनीचे आर्थिक तपशील :
अदानी एंटरप्रायझेस कमोंक आपल्या आर्थिक निकालात म्हंटले आहे की, कंपनीचा निव्वळ खर्च आर्थिक वर्ष 2023 मध्ये 30,179.51 कोटी पर्यंत पोहचला आहे. Q4 FY22 मध्ये हा खर्च 24,673.25 कोटी होता जो 22.31 टक्के वाढला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीचा निव्वळ खर्च 134,555.90 कोटीवर पोहचला आहे, जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये 69,480.64 कोटी रुपये नोंदवला गेला होता. कंपनीचा PAT आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,472.94 कोटीवर जाण्याची शक्यता आहे, जो 2022 मध्ये फक्त 776.56 कोटी रुपये होता.

कंपनीच्या कर कपाती नंतरच्या नफ्यात 218.44 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे EPS आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत 6.34 वर पोहोचले होते, जे Q4FY 2022 मध्ये 2.77 वर होते.

‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात वर्षानुवर्षे दुपटीने वाढ झाली असून कंपनीचा नफा 3,957 कोटी रुपयेवर पोहचला आहे. अदानी समूहाने आपल्या तिमाही निकालात म्हंटले आहे की, “आमचे लक्ष शासन, अनुपालन, कार्यप्रदर्शन, रोख प्रवाह मजबूत करण्यावर आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2023 पासून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी ‘गौतम एस अदानी’ यांना कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. गौतम अदानी यांचा सध्याचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price today on 05 May 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x