26 June 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

Marathwada Flood | मराठवाड्याला प्रसंगी कर्ज काढून 4 हजार कोटींची नुकसान भरपाई - उपमुख्यमंत्री

Marathwada Flood

बारामती, 10 ऑक्टोबर | अतिवृष्टीने मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हिशेब केल्यास नुकसान भरपाईसाठी साधारणत: चार हजार कोटी रुपये लागणार (Marathwada Flood) आहेत. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून ही भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

Marathwada Flood. Out of 48 lakh hectares in Marathwada, 32 to 36 lakh hectares have been damaged due to heavy rains. If calculated as per NDRF norms, it will cost around Rs 4,000 crore to compensate :

उपमुख्यमंत्री म्हणाले, ४ पालकमंत्र्यांनी मराठवाड्याला मदतीची मागणी केली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीनंतर माहिती घेण्याची सूचना पुनर्वसन विभागाला दिली. निर्णय मुख्यमंत्री घेतील. खरिपात पीक कर्ज घेऊन वेळेत फेडणाऱ्यांना शून्य टक्के व्याज लावायचे, असा निर्णय घेतला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे वेळेत कर्जफेड कठीण आहे. त्यांचे पीकच राहिले नाही. दुष्काळात कर्जाचे पुनर्गठन करून पुढील कर्जासाठी पात्र ठरवतो. तो निर्णयही घेतला जाणार आहे.

केंद्राने पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर भरपाई वाटप:
मंत्री अजित पवार म्हणाले की, पीक विम्याच्या पहिला हप्त्यापोटी राज्य सरकारने ९७४ कोटी रुपये दिले आहेत. केंद्र सरकारचा हप्ता येणे बाकी आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची काल बैठक झाली. त्यात राज्य सरकारने हप्ता भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तीन दिवसांत केंद्राकडून सुमारे एक हजार कोटींचा हप्ता भरला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Marathwada Flood it will cost around Rs 4000 crore to compensate.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x