12 December 2024 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

BCL Industries Share Price | शेअरची किंमत 74 रुपये, अवघ्या 2 वर्षात दिला 620 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.22 टक्क्यांच्या घसरणीसह 72.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत.

बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 80.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 37.97 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1950 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के वाढीसह 74.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 5 दिवसांत बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तीन टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के परतावा कमवून दिला आहे.

मागील 1 वर्षात BCL इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 80 टक्के वाढवले आहे. 26 मार्च 2021 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड स्टॉक तब्बल 620 टक्के वाढला आहे.

12 फेब्रुवारी रोजी बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 494.66 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील तिमाहीत कंपनीने 385.82 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 448.70 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने डिसेंबर तिमाहीत 28.86 कोटी रुपये PBT म्हणजेच करपूर्व नफा (प्रॉफिट बिफोर टॅक्स) नोंदवला आहे. मागील तिमाहीत या कंपनीने 21.89 कोटी रुपये PBT नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 33.33 कोटी रुपये PBT नोंदवला होता.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 24.11 कोटी रुपये PAT म्हणजेच कर कपाती नंतरचा नफा (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) नोंदवला होता. मागील तिमाहीत कंपनीने 12.83 कोटी रुपये PAT नोंदवला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 25.16 कोटी रुपये PAT नोंदवला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price NSE Live 14 February 2024.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x