18 January 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपला देखील वेळोवेळी पगार वाढवा. पगारवाढीमुळे आर्थिक चणचण कमी होऊ लागतात. आपण वेगवेगळ्या वस्तूंवर किंवा घरासाठी लोन घेतलेले असते अशा परिस्थिती पगार वाढीनंतर बऱ्याच व्यक्ती लवकरात लवकर ईएमआय भरण्यासाठी पैसे वळवतात. तर, काहीजण भविष्यासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. परंतु या दोन्हीही पर्यायांमध्ये कोणता पर्याय तुमच्यासाठी जास्तीत जास्त फायद्याचा ठरू शकतो याबद्दल जाणून घेऊया.

एसआयपी की ईएमआय :

पगारवाढीनंतर तुम्हाला देखील तुमच्या गरजा भागवण्यासाठी एक्स्ट्रा पैशांचा वापर करायचा असतो. परंतु आपण विविध वस्तूंवर लोन त्याचबरोबर अशा अनेक खर्चिक गोष्टी केलेल्या असतात ज्या आपल्याला भरून काढायचे असतात. पगारवाढीनंतर सर्वप्रथम कोणताही व्यक्ती खर्चाचे नियोजन करण्याकडे जास्त लक्ष देतो. परंतु तुमच्यासाठी दोघांपैकी कोणता नियम फायद्याचा ठरेल हे देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

एसआयपी :

समजा एखाद्या व्यक्तीने पगार वाढीनंतर एसआयपीमध्ये जास्त पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार केला तर, दीर्घकाळात तुम्ही ठरवलेल्या फंडापेक्षा आणखीन मोठा फंड तयार करण्यास मदत होईल. समजा तुम्ही जास्त पैशांची गुंतवणूक करत असाल आणि दीर्घ काळासाठी एसआयपी सुरू ठेवत असाल तर, तुम्ही करोडपती बनू शकता.

समजा तुम्ही गुंतवणुकीसाठी एसआयपी हे माध्यम निवडले असेल तर, तुम्ही नेमक्या कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक करत आहात याची खात्री करून घ्या. अन्यथा गोत्यात याल. कारण की एसआयपी म्हणजे शेअर मार्केटची लिंक असलेल्या योजना असतात. यामधील परताव्याचा चढ-उतार निश्चित नसतो. त्यामुळे संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक करा.

ईएमआय :

तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी EMI भरून मुक्त होऊ शकता. पगार वाढ झाल्याबरोबर इतर ठिकाणी पैसे वाया न घालवता ईएमआयमध्ये योगदान वाढवले तर तुमचे लवकरात लवकर कर्जाचे पैसे फिटतील. त्याचबरोबर लवकर EMI भरल्यामुळे तुम्हाला व्याजदराचे पैसे देखील कमीत कमी भरावे लागतील. अशा पद्धतीने तुमची लाखोंची बचत होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Investment Tips Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x