15 December 2024 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Adani Power Share Price | 1 वर्षात 200% परतावा दिला, अदानी पॉवर शेअर 820 रुपयांवर जाणार? तज्ज्ञांकडून मोठी अपडेट

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असेलल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सचे मूल्यांकन आकर्षक वाटत आहेत. हा स्टॉक गुंतवणुकदारांना मध्यम ते दीर्घकाळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतो. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 599.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने 646 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या किमतीवरून हा स्टॉक 8 टक्के कमजोर झाला आहे. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स जानेवारी 2022 मध्ये 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 600 रुपये किमतीच्या पार गेला होता. सध्या या कंपनीने आपले कर्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.

अदानी पॉवर कंपनीने आपली थर्मल पॉवर निर्मिती क्षमता 15.21 GW वरून वाढवून 21 GW वर नेण्याची योजना आखली आहे. तज्ञांनी अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक दीर्घकाळात 750 रुपये आणि नंतर 820 रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एसएस वेल्थ स्ट्रीट फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉकमध्ये 500 रुपये किमतीवर मजबुत सपोर्ट पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 15 April 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x