14 December 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी

JP Power Share Price

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. मार्च तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली आहे. तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर मंगळवारी जयप्रकाश पॉवर कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 5 टक्के वाढीसह 19.99 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )

12 फेब्रुवारी 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 23.99 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर मे 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 5.57 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. 4 जानेवारी 2008 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 137 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मार्च 2020 मध्ये कोरोना महामरित या कंपनीचे शेअर्स 60 पैसेवर आले होते.

मार्च 2023 तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीला 43.99 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर या तिमाहीत कंपनीने एकूण 1863.63 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने 1,385.41 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने 1021.95 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 55.42 कोटी रुपये नफा कमावला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न. 7,151.29 कोटी रुपये नोंदवले गेले होते. तर मागील आर्थिक वर्षात कंपनीने 5,922.15 कोटी रुपये कमाई केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 01 May 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x