Gland Pharma Share Price | 'ग्लँड फार्मा' शेअर उच्चांकी पातळीच्या 80 टक्के खाली, स्वतःत खरेदी करावा का? स्टॉक डिटेल्स पहा
Highlights:
- पाच ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 29.76% कमजोर
- शेअर उच्चांकी पातळीच्या 80 टक्के खाली
- IPO इश्यू किमतीपेक्षा ही 42% खाली
- कंपनीची आर्थिक कामगिरी
Gland Pharma Share Price | ‘ग्लँड फार्मा’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरमधे 19 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मात्र आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 6.92 टक्के वाढीसह 955.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पाच ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 29.76% कमजोर
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या निश्चित किंमत पातळीवर आले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 29.76 टक्के कमजोर झाले आहेत. ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये ही घसरण निराशाजनक तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे.
शेअर उच्चांकी पातळीच्या 80 टक्के खाली
ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3176.75 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या 80 टक्के खाली आहे. ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 4,350 रुपये होती. मात्र शेअरची किंमत 80 टक्क्यांनी घसरुन 955.40 रुपये वर आली आहे.
IPO इश्यू किमतीपेक्षा ही 42% खाली
12 ऑगस्ट 2021 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 4350 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 1,500 रुपये या आपल्या IPO इश्यू किमतीपेक्षा ही 42 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 20 नोव्हेंबर 2020 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
आर्थिक वर्ष 2022-2023 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत ग्लँड फार्मा कंपनीच्या PAT मध्ये म्हणजेच कर कपातीनंतरच्या नफ्यात 72 टक्के घसरण झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीने फक्त 78.70 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत ग्लँड फार्मा कंपनीने 285.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
या फार्मा कंपनीचा महसूल देखील वार्षिक आधारावर 29 टक्के कमी झाला असून 785 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. भारतीय तसेच परकीय बाजारपेठेतील प्रमुख उत्पादनांचा सेल्स कमी झाल्याने कंपनीच्या महसुलात तूट निर्माण झाली आहे. ग्लँड फार्मा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14537 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Gland Pharma Share Price today on 23 May 2023.
FAQ's
The share price of any stocks is volatile and keeps changing throughout the day owing to different factors. Gland Pharma share price is ₹939.95 as of 23 May ’23.
Market capitalization, short for market cap, is the market value of a publicly traded company’s outstanding shares. The market cap of Gland Pharma is ₹15,410 Cr as of 23 May ’23.
तज्ज्ञांना हा शेअर खरेदीसाठी कमजोर वाटतो आहे. ग्लॅंड फार्मा लिमिटेडची किंमत अल्पावधीत घसरण्याची शक्यता आहे. तथापि, कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी गुणवत्ता आणि मूल्यांकनावरील रेटिंग तपासा.
You can buy Gland Pharma Ltd (GLAND) shares by opening a Demat account with Upstox.
तेलंगणातील एका कारखान्यातील उत्पादन बंद आणि मंदावलेल्या मागणीमुळे आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ७२ टक्क्यांनी घसरून ७९ कोटी रुपयांवर आल्याने बीएसईवर ग्लॅंड फार्माच्या शेअर्सच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी घसरल्या.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News