27 November 2022 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरून माध्यमांना विचलित करण्यासाठी महाराष्ट्रात विरोधकांवर पोलीस कारवाया सुरु?

Jitendra Awhad Arrested

NCP Leader Jitendra Awhad | काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक अशा दक्षिणेकडील राज्यांतून महाराष्ट्रात पोहोचली आहे. राज्यात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस असून आता या यात्रेच्या माध्यमातून विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले आहेत. आज शुक्रवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यात सहभागी होणार आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांच्याऐवजी आदित्य सामील होणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही या यात्रेत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हजर होते. ही यात्रा आज सायंकाळी हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार असून, यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. दरम्यान, राज्यातील प्रसार माध्यमांनी देखील याचे कव्हरेज केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, राज्यात माध्यमांना विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नव्या युक्त्या आखल्याचं म्हटलं जातंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलं आहे. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Police action against NCP leader Jitendra Awhad in Thane check details 11 November 2022.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad Arrested(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x