12 December 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

पूजा चव्हाण प्रकरण, भाजपची सत्ता येताच याच प्रश्नावर चित्रा वाघ यांनी पत्रकारांना दम भरला, म्हणाल्या 'सुपारी घेऊन प्रश्न विचारतात'

BJP Leader Chitra Wagh

BJP Leader Chitra Wagh | दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली होती. या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उडी घेतली होती. त्यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान होत नाही. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत, सप्ना पाटकर, नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात आला होता, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होते.

दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर कठोर भाषेत दोषारोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी पूर्णपणे राजकीय पलटी मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा ठपका भाजप तसेच महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता.

अमरावतीत दौऱ्या दरम्यान
अमरावतीत दौऱ्या दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, ‘संजय राठोड प्रकरण आता संपवूया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात लढा सुरूच राहील पण तो न्यायालयात. तेथे माझा लढा सुरू राहील. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही विचारा असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला होता.

यवतमाळ दौऱ्यावर
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ आज यवतमाळ दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना संजय राठोड प्रकरणाबाबतचा सवाल करताच चित्रा वाघ भडकल्या. त्या तावातावाने उभ्या राहिल्या आणि पत्रकारांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली.

भडकलेल्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांना हिंदी भाषेतूनच झापण्यास सुरुवात केली. न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हू ना न्यायालय में. आप मुझको मत सिखाईये, असं त्यांनी संतापत म्हटलं. असल्या पत्रकार ना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात, असं म्हणत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. यावेळी त्यांच्या संतापाचा पारा अनावर झाला होता. त्यांनी हातवारे करतच पत्रकारांना झापलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Leader Chitra Wagh angry over journalist after question regarding Puja Chavan case check details 11 November 2022.

हॅशटॅग्स

#BJP Chitra Wagh(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x