12 December 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कबुली देत महाराष्ट्रद्रोही भाजपचा खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगनाचं अभिनंदन - आ. रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar, attacks BJP, Kangana Ranaut tweet

मुंबई, ४ जानेवारी: उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. अर्थात, या कार्यालयाच्या खरेदीचा राजकारणाशी किंवा शिवसेना प्रवेशाशी अजिबात संबंध नाही, असं खुद्द त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु, त्यावरून कंगनानं काल त्यांना टोमणा मारला होता. ‘मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भारतीय जनता पक्षाला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,’ असं ट्वीट तिनं केलं होतं.

त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाला उत्तर दिलं होतं. ‘वेळ आणि जागा तू सांग. माझ्या खरेदीच्या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन तुला भेटायला येते. माझ्या व्यवहाराचा राजकारणाशी संबंध नाही हेही तुला दाखवेन, असं उर्मिला यांनी म्हटलं होतं.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करताना कंगना राणावत हिनं केलेल्या एका ट्वीटवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात ट्विट करताना आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, “भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही भाजपचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगनाचं अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा द्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल!”

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has targeted the Bharatiya Janata Party (BJP) in a tweet by Kangana Ranaut criticizing actress Urmila Matondkar. In this regard, while tweeting, MLA Rohit Pawar said, “Kangana should be congratulated for confessing that she defamed Maharashtra only to please the BJP and for bringing a true face under the guise of anti-Maharashtra BJP.

News English Title: NCP MLA Rohit Pawar attacks BJP over Kangana Ranaut tweet news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x