26 July 2021 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

खडसेंच्या रिट्विटमध्ये थेट मोदींवर निशाणा | भाजपाच्या राजकीय गळतीचे संकेत

Retweeting, NCP Jayant Patil, BJP Eknath Khadse, PM Narendra Modi

जळगाव, २१ ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. कारण जयंत पाटील यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासोबत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत शरद पवारांनी देखील दिले होते, त्यानंतर एकनाथ खडसेंनी देखील यावर खुद्द संकेत दिले आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं की, आजच्या भाषणात पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला. खडसेंनी हे ट्विट रिट्विट करत आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता खरी ठरवली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली होती, याला एकनाथ खडसेंनी पाठिंबा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! असा आरोप त्यांनी नरेंद्र मोदींवर केला होता, मात्र उत्सुकता म्हणजे एकनाथ खडसेंनी हे ट्विट रिट्विट केलं. त्यामुळे एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चितच झाल्याचं दिसून येत आहे.

 

News English Summary: All that remains is the formality of senior BJP leader Eknath Khadse’s entry into the NCP. Because Eknath Khadse has retweeted the tweet criticizing Modi by Jayant Patil. Eknath Khadse’s entry into the NCP is almost certain and former MLAs and office bearers will also join the NCP.

News English Title: Retweeting NCP Jayant Patil tweet by BJP Eknath Khadse criticized PM Narendra Modi News updates.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x