MNS Party Say No To Halal Campaign | ‘से नो टू’ हलाल या मोहिमेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेतील दोन बडे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मांडलेली भूमिका ‘से नो टू’ हलाल ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. तर हीच मनसेची अधिकृत भूमिका असून राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुनच ही मोहिम सुरु केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले आहे. सोबतच ज्या बैठकीत ही मोहिम ठरली त्या बैठकीला नांदगावकर नव्हते त्यामुळे त्यांना याबाबत माहिती नाही, असेही किल्लेदार यांनी सांगितले आहे.

काल पत्रकार परिषद घेवून मोहिमेची घोषणा :
काल यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषद घेवून या मोहिमेची घोषणा केली होती. किल्लेदार म्हणाले होते, हलाल ही मुस्लिम धर्मियांकडून बकऱ्याला कापण्याची ही क्रूर पद्धत आहे. ऐवढचं नाही तर मक्क्याकडे तोंड करून त्यांची कत्तल होते. 15 टक्के मुस्लिम धर्मियांची ही पद्धत 85 टक्के लोकांवर का लादायची. हा मुद्दा फक्त धार्मिक मुद्दा नाही तर अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम याकडे आम्ही पाहत आहोत. याचे पैसे अतिरेक्यांच्या न्यायालयील खटल्यांसाठी वापरले जातात. यासाठी जनजागृती म्हणून ‘नो टू हलाल मोहीम’ ही चळवळ उभी करणार आहोत असं किल्लेदार म्हणाले होते.

नांदगावकर म्हणाले, आमच्या एका कार्यकर्त्याने ती मागणी केली आहे, मात्र ‘से नो टू हलाल’ ही पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्षप्रमुख एखादी मागणी करत नाहीत तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे उचित नाही. एखादा कार्यकर्ता कुठेतरी पत्र देतो आणि त्यावर आम्ही भाष्य करणे हे उचित नाही, असेही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी यशवंत किल्लेदार यांच्या मोहिमेतील हवा काढण्याचा प्रयत्न तर केलाच तसेच नांदगावकरांनी ‘आमच्या एका कार्यकर्त्याने’ असा शब्दप्रयोग करून पदाधिकारी शब्दाला बगल दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yashwant Killedar and Bala Nandagonkar controversy in MNS party leaders over halal meat check details 29 August 2022.

‘से नो टू हलाल’ अभियान, नांदगावकर सांगतात ही मनसेची अधिकृत भूमिका नाही | तर किल्लेदार म्हणाले राज ठाकरेंशी चर्चा करुनच मोहिम सुरु