23 April 2025 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN
x

खडसे काय थांबेना | भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकरच राष्ट्रवादीत

BJP MLA from Khandesh, join NCP, Eknath Khadse

जळगाव, २३ डिसेंबर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. आता भाजपला आणखी एक बसण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (BJP MLA from Khandesh will soon join NCP party through Eknath Khadse)

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कार्यकर्तेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपर्यंत सर्वांनी राष्ट्रवादीचा वाट धरली आहे. खडसे यांच्या निवास्थानी आधीच भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्त हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. आता तर थेट विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार असं खात्रीलायक वृत्त आहे. या प्रवेश सोहळ्यात भारतीय जनता पक्षामधील दोन मोठ्या नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे नाशिकमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचं मोठं विधान शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केलं आहे. बुधवारी शिवसेनेमध्ये असलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावर शिवसेनेकडून चांगलीच टीका करण्यात आली आहे. काल झाले ते प्रवेश फक्त ‘झांकी’ आहे. भारतीय जनता पक्षाचे बडे नेते अभी ‘बाकी’ आहे, अशा शब्दात सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना इनकमिंगविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये शिवसेनेत मोठं इनकमिंग होणार असल्याचं विधान बडगुजर यांनी केलं आहे.

 

News English Summary: After senior leader Eknath Khadse joined the NCP, the BJP has suffered a major setback in North Maharashtra. Now the BJP has a strong chance of another seat. It is learned that the incumbent BJP MLA and two senior leaders will soon join the NCP.

News English Title: BJP MLA from Khandesh will soon join NCP party through Eknath Khadse news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या