28 September 2020 8:31 PM
अँप डाउनलोड

सत्ताकाळात राज ठाकरेंनी नवीन आराखड्यानुसार आखलेलं कालिदास कलामंदिर नाट्यगृह अंतिम टप्प्यात

नाशिक :  नाशिक महानगर पालिकेत आज मनसेची सत्ता नसली तरी त्यांच्या सत्ताकाळात झालेली विकास कामं आजही विद्यमान सत्ताधाऱ्यांना जमत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील विद्यमान भाजप पक्ष स्मार्ट सिटीच्या नावाने मनसेच्या सत्ताकाळातील पूर्णत्वाला गेलेले प्रकल्प केंद्राला स्वतःचे म्ह्णून दाखवत असल्याचे अनेक वर्तमान पत्रातील बातम्यांमधून उघड झालं होत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज ठाकरेंच्या संकल्पनेतील तत्कालीन अजून एक प्रकल्प म्हणजे कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे नवीन आराखड्याप्रमाणे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. नव्या आराखयद्यानुसार अध्यावत कालिदास कलामंदिर नाट्यगृहात अ‍ॅकोस्टिक ध्वनी यंत्रणा, व्यासपीठाची रचना बदल, पडद्यांची संख्या वाढविण्यात आली, प्रकाशयोजना व सर्व तांत्रिक गोष्टी या यंत्राधारित, रंगकर्मीना तयार होण्यासाठी देण्यात येणारी वेगळी ग्रीन रूम, ९५० प्रेक्षकांसाठी आरामदायी खुच्र्या, अल्पोपाहारगृह आणि स्वच्छतागृहातही बदल करत त्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीच्या संचालक मंडळाची वार्षिक सभा स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. स्मार्ट सिटी एसपीव्ही कंपनीची नोंदणी कंपनी कायद्यानुसार असल्याने कंपनीच्या संचालक मंडळाला वार्षिक सभा घेऊन संचालकांना कामकाजाचा आढावा देणे बंधनकारक असल्याने ही सभा घेण्यात आली होती. त्यात नवीन संचालकांची नियुक्ती आणि वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला होता. यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या नव्या प्रकल्पांसह मनसेच्या पंचवार्षिक काळात सीएसआर मधून झालेल्या कामाचे सादरीकरण करून त्याला मंजुरीही घेण्यात आली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांना मंजुरी या बैठकीत देण्यात आली होती आणि या कंपनीने नाशिककरांची ‘स्मार्ट फसवणूक’ केल्याचे समोर आले.

भाजप सरकारने नेमलेल्या या कंपनीने मनसेच्या काळात आणि राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या होळकर पुलावरील फाउंटन, स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण, बोटॅनिकल गार्डन, कालिदास नाट्यगृह नूतनीकरण, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना ‘पुन्हा’ मंजुरी देऊन ती कामे आपण पूर्ण केल्याचा ‘स्मार्ट’ दावा करण्यात आला होता, जो मुळात मनसेच्या काळात आधीच पूर्ण होऊन, त्याच नाशिकच्या जनतेला जाहीर सादरीकरण सुद्धा करण्यात आलं होत हे सर्वश्रुत आहे.

नाशिक महानगर पालिकेत प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. त्यावर नाशिकरांनी विश्वास ठेऊन भरगोस मतदान सुद्धा केलं होत. परंतु नाशिक पालिकेत सत्ता आल्यावर संपूर्ण शहराचा विकासचं खुंटला आहे. एकूणच नाशिक महानगर पालिकेतील मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामं आजही नाशिक मधील आकर्षण आहे आणि ती दृश्य स्वरूपातील आहेत. परंतु नवनियुक्त भाजप सरकारची कामं आजही नाशिक शहरात शोधावी लागतील अशीच स्थिती आहे.

वार्षिक सभेत मंजूर केलेले प्रकल्प जे आधीच मनसेने पूर्ण केले होते आणि कंपनीने दाखवलेली अंदाजित रक्कम

  1. स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय : २ कोटी
  2. चिल्ड्रेन्स ट्राफिक पार्क : ४ कोटी
  3. बोटॅनिकल गार्डन (नेहरू वनौषधी उद्यान) : १२ कोटी
  4. घनकचरा व्यवस्थापन १ कोटी २५ लाख
  5. उड्डाणपूल सुशोभीकरण : १ कोटी ५० लाख
  6. होळकर पुलावरील फाउंटन : ९५ लाख
  7. कालिदास नाट्यगृह नूतनीकरण : ९ कोटी ५१ लाख
  8. सरकारवाडा नूतनीकरण पहिला टप्पा : ८ कोटी ५० लाख

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(638)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x