27 July 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

नाशिकमध्ये वसंत गीते समर्थकांमध्ये फूट, भाजप'ला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश: भुज'बळ' पावर

नाशिक : नाशिक भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. भाजपचे महत्वाचे पदाधिकारी व वसंत गीते समर्थक भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर या घडामोडींना जोर आला आहे. भाजप’मधील पक्ष फुटी नाशिकमधून सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या संबंधित स्थानिक युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अजिंक्‍य गिते, बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, जय कोतवाल, धनाजी लगड, आकाश तेजाळे हे प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाजपमध्ये होणारी खदखद सर्वच पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. संबंधित सर्व पदाधिकारी हे वसंत गीते यांचे समर्थक समजले जातात. मनसेतून निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करणारे हे पदाधिकारी अल्पवधीतच भाजपमध्ये सुद्धा अन्याय होत असल्याचं जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे हा वसंत गीते यांच्यासाठी सुद्धा धक्का मानला जात आहे.

संबंधित सर्व पदाधिकारी हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असून, त्यासाठी १ ऑगस्ट ही तारीख निश्चित झाल्याचे समजते. या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी जय्यत केली असून राष्ट्रवादीच्या प्रवेशावेळी शक्ती प्रदर्शन करण्याची योजना या पदाधिकाऱ्यांनी आखली आहे.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेतील मोठ्या यशानंतर सुद्धा भाजप नाशिकमध्ये विशेष कामगिरी करू शकलेलं नाही. आजही भाजपला नाशिक स्मार्ट सिटीच्या नावाने मनसेच्या काळातील प्रकल्पांचाच आधार घ्यावा लागत असल्याने, त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत भोगावे लागू शकतात असं म्हटलं जात.

हॅशटॅग्स

#NCP(372)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x