नागपूर : अधिवेशनापूर्वी सिडको येथील जमीन व्यवहार प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिल. मुख्यमंत्र्यांनी काही स्पष्टीकरण देऊन थेट न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा आज अधिवेशनात केली.

विरोधकांनी आरोप केलेल्या त्या २०० जमीन प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विरोधकांना प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री खुलासा करत म्हणाले की, आघाडीच्या राज्यात पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पग्रस्तांना ६६० हेक्टर जमिनीचे वाटप झाले होते. संबंधित जमिनी या जिल्हाधिका-यांच्या अखत्यारितील आहेत आणि आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याधिका-यांचे अधिकार वाढवून, जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याने त्याचा थेट संबंध हा मंत्र्यांशी नाही. तुम्ही केवळ शेजा-यांच्या सांगण्यावरून बिनबुडाचे आरोप करू नका, असा सणसणीत टोला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला.

सर्व खुलासे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या जमीन वाटप प्रकरणासह आघाडी सरकारच्या काळात अशाच प्रकारे देण्यात आलेल्या सुमारे २०० जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपूर अधिवेशनात केली. हम काच के घरमें रहते नही. जिनके घर शीशे के होते है, उनको संभलकर रहना चाहिये, अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.

CM devendra fadanvis has issue a order of court enquiry on CIDCO land scam in Maharashtra