7 August 2020 8:45 AM
अँप डाउनलोड

नागपूरमध्ये पावसाने केली सरकारची नाचक्की

सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळाचा आजचा तिसरा दिवस असून वीजपुरवठा खंडित असल्या कारणाने आजचा विधिमंडळाचा दिवस वाया गेल्याची चिन्ह आहेत. काल रात्रीपासूनच्या सततच्या पावसाने शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी साठले आहे आणि याच कारणाने शहरात बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

विधिमंडळाच्या तळघरात पाणी शिरल्याने विधिमंडळाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अर्थातच अंधारात काम करणे शक्य नसल्याने विधिमंडळाचे कामकाज आज बंद करण्यात आले. वीजपुरवठा नसल्याने कामकाज बंद पडण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे असा सूर विरोधकांनी लावला.

विधिमंडळात येताना आज सर्वच आमदारांची चांगलीच तारांबळ उडाली आणि सर्व आमदारांना अंधारातच बसावं लागलं. नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या शिवसेना आमदारांना देखील मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात घोषणा बाजी करावी लागली. केवळ सरकारने हट्टापायी सगळी यंत्रणा नागपूर अधिवेशनात लावली उलट हे अधिवेशन नागपुरात केलं तर थोड्याच पावसाने विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होईल असं एका अहवालात सांगण्यात आलं होत, अशी माहिती विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. जर हे अधिवेशन मुंबईमध्ये केलं असतं तर मुंबईतील सुसज्ज यंत्रणेमुळे सरकारवर हि नामुष्की ओढवली नसती असे मत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी व्यक्त केले.

अर्थातच काय जिकडे सरकार एवढी सुसज्ज यंत्रणा घेऊन तोंडघशी पडली तिथे सर्वसामान्य माणसाचे होणारे रोजचे हाल आणि पावसामुळे प्रवासात होणारा त्रास हे सरकार कधी समजेल एवढीच आशा.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x