नवी दिल्ली : सामान्य मध्यमवर्गीय नागरिकच नाही तर आता आर.एस.एस ची कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ सुध्दा अर्थसंकल्पावर नाराज असल्याचे समजते. केवळ नाराजीच नाही तर त्याविरोधात देशभर जोरदार निदर्शनं ही होणार आहेत.

भारतीय मजदूर संघाने केलेल्या आरोपानुसार या अर्थसंकल्पात अंगणवाडी आणि कामगारांच्या मागण्यांकडे संपूर्ण कानाडोळा करण्यात आला आहे. त्या विरोधाचाच भाग म्हणून आता भारतीय मजदूर संघ देशभर जोरदार निदर्शनं करणार असल्याचे भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस व्रिजेश उपाध्याय यांनी प्रसार माध्यमांना पत्रकाद्वारे कळवले आहे.

भारतीय मजदूर संघाच्या म्हणण्यानुसार आधीच नोटबंदी आणि जीएसटी मुळे लघु आणि मध्यम उदयोगांचे प्रचंड नुकसान होऊन अनेक जण बेरोजगार ही झाले आहेत. त्यात कालच्या अर्थसंकल्पात कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुले, भारतीय मजदूर संघाने मोदी सरकारच्या धोरणांवरून मोठी टीकेची झोड उठविण्याचे ठरले आहे.

आधी शिवसेना, टीडीपी आणि आता भारतीय मजदूर संघ असे एक ना अनेक भाजपशी संबंधित पक्ष आणि संघटना मोदी सरकार विरोधात रान उठवत आहेत.

Bhartiya Majdoor Sangh is not happy with the Modi Governments budget 2018