19 January 2022 1:57 AM
अँप डाउनलोड

राजस्थान पोटनिवडणूक भाजपसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा.

जयपूर : राजस्थान मध्ये ३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीनही जागा काँग्रेसने खिशात घातल्या आहेत. राजस्थान पोटनिवडणूक २०१९ साठी मोदी आणि भाजपसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. विशेष म्हणजे राजस्थान मध्ये भाजपचं सत्तेत आहे.

राजस्थानमधील एकूण तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अजमेर आणि अलवर या २ लोकसभेच्या तर मांडलगढ ही विधानसभेची जागा होती. त्यासाठीच २९ जानेवारी रोजी पोटनिवडणूक पार पडली होती. या तिन्ही मतदार संघातील भाजपच्या प्रतिनिधींच आकस्मित निधन झाल्याने ही पोटनिवडणूक झाली होती.

भाजपच्या हक्काच्या या तीनही जागा काँग्रेसने स्वतःकडे अक्षरशा खेचून आणल्या आहेत. त्यामुळे ही २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ही भाजप आणि मोदींसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. काँग्रेस मध्ये या विजयानंतर आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Congress(526)#Modi(10)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x