29 March 2024 6:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

मला गोळ्या घाला, सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार; ओवेसींचं अनुराग ठाकूर यांना प्रतिउत्तर

MIM President Asaduddin Owaisi, Union minister Anurag Thakur, Shoot Him

मुंबई: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘देशातील गद्दारांना गोळ्या घातल्या पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना फटकारले आहे. तसेच ‘तुम्ही मला गोळ्या घाला. त्यासाठी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे.’ असे आव्हान ओवैसी यांनी अनुराग ठाकूर यांना दिले आहे.

नागपाडा येथील झूला मैदान येथे व्हॉईस ऑफ इंडिया आयोजित कार्यक्रमात औवेसी म्हणाले, ‘मी तुला अनुराग ठाकूरला आव्हान देईन, मला देशातील कोणतीही जागा सांगा, जिथे तुम्ही मला गोळी घालाल आणि मी येण्यास तयार आहे. तुमच्या वक्तव्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण होणार नाही कारण आमच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती. रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को..’ अशी घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो *** को’ अशी घोषणाबाजी केली होती.

 

Web Title:  MIM President Asaduddin Owaisi challenges Union minister Anurag Thakur to Shoot him.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x