मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. CAA आणि NRC विरोधात तसंच, देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्याचं आवाहन भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांनीही बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र बंदमध्ये ५०हून अधिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात आज या बंदला आज कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं पुकरालेल्या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूर शहर व जिल्ह्यात बंद यशस्वी व्हावा, यासाठी वंचितसह अन्य संघटनांच्या नेत्यांनी जनजागरणासाठी बैठका घेतल्या. बंदच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय व शहराच्या कार्यकारिणीची गुरुवारी वंचितची संयुक्त बैठक झाली. यास विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

यावेळी केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आंबेडकर यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे, असे देखील ते म्हणाले.

 

Web Title:  Prakash Ambedkar Vanchit bahujan Aghadi called Maharashtra bandh.

CAA – NRC विरोधात वंचित’कडून आज महाराष्ट्र बंद; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड