5 May 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम
x

मोजकी राज्य सोडली, तर भाजपकडे राज्यांची सत्ता नव्हती | म्हणून ईडी, सीबाआय मागे लावून अनेक राज्यात सरकारं पाडली - शरद पवार

Sharad Pawar

Sharad Pawar Press Conference | ज्या राज्यांमध्ये आपल्या विचारधारेची सरकारं नाहीत, तिथं ईडी, सीबाआय मागे लावून, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी फोडून भाजपचं सरकार स्थापन करण्याचा उपक्रम केंद्रातील सरकारकडून राबवला जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. बिगर भाजपशासित राज्यातील सरकार पाडल्याचा आरोप करतानाच शरद पवारांनी यादीच वाचून दाखवली. शरद पवार आज (२९ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी थेट केंद्र सरकार आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर गंभीर आरोप केले.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर :
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि राज्यातील सत्ता पाडण्याबद्दल पवार म्हणाले, “राजकीय नेतृत्वाकडून काही ना काही कारणातून कुणावर खटले, कुणामागे ईडी, कुणामागे सीबीआय लावता येईल का, हे प्रकार सुरु आहेत. हे महाराष्ट्रातच नाहीये. गुजरात, झारखंडमध्येही याच तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी आज केंद्रात ज्यांची सत्ता आहे, पण राज्यात त्यांची सत्ता नाहीये, अशा ठिकाणी सत्तेवर असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करायचं. हाही एक उपक्रम भाजपनं अनेक राज्यांमध्ये ज्याठिकाणी बिगर भाजपची सरकार आहे, तिथे घेतला गेला.

लोकांनी सत्ता दिली नाही म्हणून :
लोकांनी सत्ता दिली नाही, तर लोकांनी दिलेल्या सदस्यांना फोडून, आमिष दाखवून त्यांना बाजूला करून सत्ता हातामध्ये घ्यायची, हे सूत्र भाजपनं केलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं दिसतंय की, देशामध्ये राज्यांच्या राज्य सरकार स्थापन करण्याची केव्हा संधी मिळेल, यावर त्यांचा विश्वास नाहीये. अलिकडेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. केरळमध्ये बिगर भाजपशासित राज्य आहे. तामिळनाडूत बिगर भाजपशासित सरकार आहे. कर्नाटकात बिगर भाजपशासित राज्य होतं. आंध्र प्रदेशात बिगर भाजपशासित सरकार आहे. महाराष्ट्रात बिगर भाजपचं सरकार होतं. मध्य प्रदेशात, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही बिगर भाजप पक्षाची सरकार आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

मोजकी राज्य सोडली तर… :
मोजकी राज्य सोडली, तर भाजपकडे राज्यांची सत्ता नव्हती. लोकांनी दिलेली नव्हती. लोकांचं मत त्या पक्षाविषयी काय होतंय, त्याची ही परिस्थिती आहे. माणसं फोडणं, साधनांचा वापर करणं, ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करून सत्ता काबीज करणं, हे दुर्मिळ चित्र आज देशात दिसतंय. हे आव्हान आहे. देशातील बिगर भाजप पक्षे आहेत. त्यांच्याशी संवाद साधतोय. अशा पद्धतीने जी सरकार आणली जात आहे, त्याविरोधात जनमत तयार करण्याचं काम करण्याचं आवाहन या पक्षांना करतोय”, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sharad Pawar Press Conference target Modi govt check details 29 August 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x