5 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Viral Video | साप पकडण्यासाठी येते 'साडी गर्ल', विषारी साप पकडताना नेसते साडी, नेमकी कोण पाहूया - Marathi News

Snake Catcher Woman

Snake Catcher Woman | तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर खतरनाक व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील. वाघांचे, पाळीव कुत्र्यांचे, रस्त्यांवरील कुत्र्यांचे, त्याचबरोबर विषारी नागांचे आणि सापांचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर दररोज वायरल होत असतात. असाच एक खतरनाक व्हिडिओ तरुणीचा आणि सापाचा वायरल होत आहे. हे तरुणी चक्क साडी नेसून साप पकडायला जाते. तिने आत्तापर्यंत पकडलेले सर्व साप हे साडी नेसूनच पकडले आहे. त्याचबरोबर तिच्या अकाउंटवर जेवढ्याही पोस्ट आहे तर त्यामध्ये तिने साडीच परिधान केले आहे.

वायरल झालेल्या तरुणीचे नाव ‘साहिबा’ असं असून तिचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत. तुम्ही हा व्हिडिओ पाहून तिचं नक्कीच कौतुक कराल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तरुणीने काळा रंगाची साडी नेसली आहे. त्याचबरोबर एका ठिकाणी भला मोठा नाग आला असून तिने त्या नागाचं रेस्क्यू केलेलं दिसत आहे. नागाला अगदी शांत करून तिने प्लास्टिकच्या मोठ्या डब्यामध्ये भरून तिने त्याला जंगलामध्ये सोडून दिलं आहे.

अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव :
वायरल झालेला व्हिडिओ पाहून तरुणीला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एका युजरने कमेंट केली आहे की,’ एक औरत का जलवाही अलग है,. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं,’ नागिनने नाग को काबू मे कर दिया’. त्याचबरोबर अनेकांनी तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या बुद्धिमत्तेचं चांगलंच कौतुक केलं आहे. तरुणीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘इंडियन कोब्रा रेस्क्यू’. म्हणजेच तिने एका कोब्रा सापाला रेस्क्यू केले आहे. भरपूर जणांनी तिचं कौतुक केलं असून तरुणीच्या आणखीनही मजेशीर आणि मनोरंजित व्हिडिओ सोशल मीडियावर अपडेटेड आहेत.

Latest Marathi News | Viral Video Snake rescue 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Snake Catcher Woman(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x