25 July 2021 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची प्रथमच समाज माध्यमांवर प्रतिक्रिया

Bollywood superstar Salman Khan, twitted first time, Sushant Singh Rajput suicide

मुंबई, २१ जून : सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नेपोटीझ्मवर जोरदार चर्चा रंगतेय. सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर, करिना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांच्यावर चहुबाजुनी टीका होतेयं. या सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरील फॉलोअर्स कमी झालेयत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोल केलं जातंय. ट्वीटरवर देखील सुशांत सिंह राजपूत नाव ट्रेंड होतंय. या पार्श्वभुमीवर सलमान खान पहिल्यांदाच बोललाय. सुशांतच्या फॅन्सना सपोर्ट करण्याचे आवाहन त्याने आपल्या फॅन्सना केलंय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सलमान खानने ट्विट करत म्हटले आहे, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतोय की, त्यांनी सुशांतच्या चाहत्यांसोबत उभे राहावे. मात्र सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाषेचा आणि शिव्याशाप देण्याच्या पद्धतीचा उपयोग करु नये. तर माझ्या चाहत्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या भावना समजून घ्याव्यात. सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला गमावले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत उभे राहा, त्यांना पाठिंबा द्या. आपली प्रिय व्यक्ती गमावणे खूप त्रासदायक असते.’ दरम्यान, सलमान खानचे हे ट्विट म्हणजे केवळ दिखावा असल्याच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह या कलाकारांसह अनेक सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली आहे. इतकेच नाही तर, सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करत निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

News English Summary: After Sushant Singh’s suicide, there is a lot of talk about nepotism in the Bollywood industry. The name Sushant Singh Rajput is also trending on Twitter. This is the first time Salman Khan has spoken against this backdrop. He appealed to his fans to support Sushant.

News English Title: Bollywood superstar Salman Khan twitted first time after Bollywood actor Sushant Singh Rajput suicide News Latest Updates.

हॅशटॅग्स

Bollywood(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x