26 January 2025 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

कृषी कायद्याविरोधात काॅंग्रेसचा मोर्चा | तोही राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात

Minister Bacchu Kadu, Congress, Farm laws

अमरावती, २१ जानेवारी: नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी कायद्या विरोधात मध्य प्रदेश काँग्रेस महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. शुक्रवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात युवक काँंग्रेसचे अध्यक्ष आ.निलेश ऊईके यांच्यासह शेकडो काँंग्रेसचे पदाधिकारी व इतर संघटना सहभागी होणार आहेत.

राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी झटणारी प्रहार संघटना आणि त्याचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे एक राज्यमंत्री आहेत. दरम्यान, बच्चु कडू यांच्या आक्रमक शैलीने मध्य प्रदेशवासियांच्या मनात सुद्धा स्थान मिळविलं आहे. त्यामुळं या मोर्चाकडं केवळ मध्यप्रदेशच नाही तर महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलं आहे.

 

News English Summary: Madhya Pradesh Congress will march against the farmers’ law under the leadership of Maharashtra’s Minister of State Omprakash alias Bachchu Kadu. The march will start at 11 am on Friday, January 22 at Pandhurna in Madhya Pradesh. Hundreds of Congress office bearers and other organisations, including Youth Congress President MLA Nilesh Uikey, will participate in the march.

News English Title: Minister Bacchu Kadu will leader the march organised by Madhya Pradesh congress against farm laws news updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x