18 February 2025 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश | त्या सुंदर अभिनेत्रीचं नाव आल्यानं खळबळ...

Mumbai police, officer Sachin Vaze, Exposed high profile sex racket

मुंबई, २१ जानेवारी: मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल ‘कास्टिंग काऊच’ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट प्रेम उर्फ संदीप इंगळे असं या निर्मात्याचं नाव असून, अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने सुरू असल्याचं समजलं. त्यामुळं सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धाड टाकली. हे हॉटेल मुंबईच्या पश्चिमी उपनगरातील जुहू बीचजवळ आहे. हे सेक्स रॅकेट बॉलिवूडचा एक कास्टिंग डायरेक्टर आणि सिनेमा निर्माता चालवत होता. सिनेमात काम मिळवण्याचं आमिष देऊन तो मॉडेल आणि अभिनेत्रींना सेक्स रॅकेटच्या दलदलीत ढकलायचा.

गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी बोगस ग्राहक तयार करून या तिघांशी संपर्क साधला. त्यानुसार तान्या आणि हनुफा यांनी व्हॉट्सअॅपवरुन पसंतीसाठी तरुणींचे फोटो पाठवले. तरुणी पसंत केल्यावर जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये येत असल्याचं या तिघांनी सांगितलं. वाझे यांच्यासह संतोष कोतवाल, रियाझुद्दीन काझी, नितीन लोंढे, कीर्ती माने, बिपीन चव्हाण, योगेश लोहकरे, म्हस्के यांच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून आठ मुलींची सुटका केली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या रॅकेटमध्ये चित्रपट, तसेच मॉडेलिंग क्षेत्रात बड्या व्यक्तींचा सहभाग आढळण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: Mumbai police’s criminal intelligence team raided a five-star hotel in Juhu on Tuesday and exposed a high-profile ‘casting couch’ racket. It is learned that the sex racket was started by Prem alias Sandeep Ingle with the help of actress Tanya Sharma and makeup artist Hanufa alias Tanvi Sardar. That is why there is a stir in Cineworld.

News English Title: Mumbai police officer Sachin Vaze team exposed high profile sex racket in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x