27 July 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

नियतीच्या मनातही एकनाथ शिंदेचं राजकीय भांड फोडणं लिहिलंय? बंडावेळी अजित पवारांचं दिलेलं कारण खोटं असल्याचं आज सिद्ध झालं

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून गुजरातमार्गे गुवाहाटीला पलायन केले होते आणि तेव्हापासून ते अजित पवार यांनी अर्थखात्याच्या माध्यमातून कसा शिवसेना संपविण्याचा कार्यक्रम केला होता आणि त्यामुळे आम्ही शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी बंड केल्याचं वारंवार सांगितलं होतं. आता तेच शिंदे अर्थमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून काम करणार आहेत. आता ते अजित पवार अर्थमंत्री असले तरी आता मी मुख्यमंत्री असल्याचे सांगत असले तरी दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असूनही त्यांना कोणत्याही निर्णयात भाजप विचारात तरी घेतं का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मग आमदार निधी देताना तरी कोण विचारात घेणार असं देखील विचारलं जाऊ लागलय.

तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार उद्या ते देखील गेलं तर शिंदे समर्थक आमदार सोडा, तर खुद्द एकनाथ शिंदे यांना देखील अजित पवारांच्या कार्यालयाचे उंबरठे वारंवार ओलांडावे लागतील. त्यात जर आमदारकीच राहिली नाही तर आमदार निधी तरी कसा मिळणार हा देखील प्रश्न निर्माण होईल असं म्हटलं जातंय.

अजित पवारांचा भाजपसोबतचा घरोबा एकनाथ शिंदेंसाठी आगामी काळात अडचणीचा ठरण्याची चिन्हं दिसत आहे. निधी वाटपातील अन्यायाच्या मुद्द्यावर बोट ठेवत शिंदेंच्या आमदारांनी बंडासाठी अजित पवारांनाही जबाबदार धरलं. पण, आता पुन्हा एकदा अजित पवारांकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदेंविरोधात ठाकरेंना बोलण्यासाठी आयता मुद्दा मिळेल असंही म्हटलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे अर्थ व नियोजन मंत्री होते. अजित पवार यांच्याकडून निधी वाटप करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना झुकत माप दिलं जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर केला होता.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदारांनाही निधी देताहेत. मुख्यमंत्र्यांकडे (उद्धव ठाकरे) तक्रार करूनही ते काहीही करत नसल्याचा सूर बंडखोर आमदारांनी त्यावेळी लावला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचे काम करत आहे, असंही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड करणाऱ्या आमदारांनी म्हटलं होतं. पण, वर्षभरातच आता एकनाथ शिंदे कात्रीत सापडताना दिसत आहे.

News Title : Eknath Shinde Exposed after Ajit Pwar getting State Finance Ministry check details on 10 July 2023.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x